ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मान सन्मान व आदर करणे हेच कर्तव्य………… खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन

0
24

मा.डॉ.उपेंद्रजी कोठेकर व खा.अशोक नेते यांच्या नेतृत्वात देवरी येथे जेष्ठ कार्यकर्ता संमेलन संपन्न…
दि.२७ जून २०२३

देवरी ः सक्षम भारताची विकसित वाटचालीस भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने राबविल्या जात असलेल्या महाजनसंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून आज देवरी विधानसभा क्षेत्रात भाजपा जेष्ठ नागरिक कार्यकर्ता संमेलन विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र जी कोठेकर व खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज देवरी येथे घेण्यात आले.

यावेळी मा.उपेंद्र जी कोठेकर यांनी बोलतांना नववर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारने अनेक योजना अमलात आणल्या, नववर्षात शासन सुशासन, प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवलं,सामान्य जनकल्याणाच्या हितासाठीच भारतीय जनता पार्टी काम करीत असते.विकासात्मक कामांना सुद्धा गती येऊन,योजनांमुळे सर्वसामान्याचे जनजीवन उंचावले आहे असे याप्रसंगी व्यक्तव्य केले.

या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना भाजपला सत्तेपर्यंत पोहचवण्याचे काम खऱ्या अर्थाने ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यांची आठवण आणि त्यांच्याप्रती मानसन्मान व आदर ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे, तेच कार्यकर्ते खऱ्या अर्थाने भाजपच्या शिल्पकाराचे प्रतीक आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त मोदी @९ हा उपक्रम देशभरात सुरू करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून या अभियानांतर्गत ,ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सातत्याने संघर्ष करून देशात भाजपचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करून सत्तेपर्यंत पोहचवले आहे. मोदी सरकारच्या पेन्शन योजना, जन धन योजना, हेल्थ कार्ड इत्यादी योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सुख-सुविधा देण्याचे काम मागील ९ वर्षांत प्रधानमंत्री मोदीजींनी केले आहे,असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

याप्रसंगी लोकसभा संयोजक वीरेंद्रंजी अंजनकर सर,माजी आमदार संजयजी पुराम,यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात मंचावर प्रामुख्याने भाजपचे डॉ.उपेन्द्रजी कोठेकर विदर्भ संघटन मंत्री, अशोकजी नेते खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा.विरेंद्र अंजनकर लोकसभा संयोजक, संजयजी पुराम माजी आमदार देवरी विधानसभा क्षेत्र,झामसिंगजी येरणे भाजपा जेष्ठ नेते,अनिल येरणे भाजपा देवरी तालुकाध्यक्ष, श्यामजी डोये जमीनदार,संजय उईके नगराध्यक्ष न.पं.देवरी, प्रज्ञाताई संगिडवार उपनगराध्यक्ष न.पं.देवरी,सविताताई पुराम सभापती महिला बाल कल्याण समिती, कल्पनाताई वालोदे जि. पं. सदस्या,अंबिकाताई बंजार सभापती पं.स.देवरी,अनिल बिसेन उपसभापती पं.स.देवरी, दिपक शर्मा भाजपा जेष्ठ नेते,
लक्ष्मण नाईक भाजपा जेष्ठ नेते, देवकीताई भरई महिला भाजपा अध्यक्षा देवरी, प्रविण दहिकर ता. महामंत्री, निलेश वालोदे ता. महामंत्री,विनोद भेंडारकर ता.महामंत्री तसेच यांच्यासह मोठया संख्येने जेष्ठ कार्यकर्ते, महिला-पुरूष उपस्थित होते.

सुरूवातीला दीप प्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल येरणे, संचालन प्रविण दहिकर, आभार सविताताई पुराम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न करून कार्यक्रम शांततेत पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here