मनीपुरच्या हिंसाचारामध्ये विदर्भातील युवक करतो शांतते साठी प्रयत्न पूर्वोत्तर भारतातील म्यानमार सीमेला लागून असलेले राज्य म्हणजे मणिपूर

0
37

मणिपूर:-3 मे 2023 पासून अचानक पणे मणिपूर मधील दोन समूहा मध्ये हिंसाचार सुरू झाला, दोन्ही समूह एकमेकांच्या रक्ताचे प्यासे झाले यात अनेक व्यक्ती जखमी झाल्या तर 100 हून अधिक लोक मृत्यूला प्राप्त झाले,अश्या या भायावाह स्थिती मध्ये मणिपूर येथे अनेक राज्यातून येणारे विध्यार्थी शिक्षण घेत होते तसेच त्यांच्या मध्ये असुरक्षितता तथा भीतीचे वातावरण निर्माण झाले.

तसे बघता ते विद्यार्थी आपल्या- आपल्या शैक्षणिक परिसरात सुरक्षित होते पण पुढे घात पात व धोक्याची शक्यता नाकारता येऊ शकत नव्हती.
तसेच बाहेरील परीस्थिती खूप भयावह होती, कधीही न ऐकलेले बंदुकीच्या गोळीचा आवाज या सर्वामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच घरच्यांची काळजी सुद्धा वाढू लागली, अशातच अभाविप च्या माध्यमातून विदर्भातून मणिपूर ला पूर्णवेळ काम करायला गेलेला युवक अक्षय राजुरकर यांना सूचना मिळते की काही विद्यार्थी घाबरले आहेत,त्यांना घरी जायचं आहे तेव्हा तो सर्वांच्या मदतीला धाऊन जातो व हवी ती मधत पुरवण्याच्या पूर्णपणे यशस्वी प्रयत्न करतो, व त्यांना शासनाच्या मदतीने आप-आपल्या घरी पाठवण्या साठी प्रत्येक राज्यातील विद्यार्थी परिषदेची जाळे या कार्याला उपयोगी ठरतात,विशेष म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील 27 विद्यार्थी जे वेग-वेगळ्या केंद्रीय विद्यापीठ मध्ये शिक्षण घेत होते,असे विध्यार्थी या कार्यकर्त्यांच्या संपर्कात करतात,त्याची भेट घेऊन परिस्थिती समजून घेतली जाते व नंतर त्यांना पाठवण्या करिता महाराष्ट्र शासन व मणिपूर शिवसेना यांच्याशी संपर्का साधला जातो व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, दोन्ही समूह एक दुसऱ्यार्च्या विरोधात सशस्त्र घेऊन जणू काही युद्धजन परीस्थिती आहे अशी वाटत असताना.

अशे विध्यार्थी या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. त्याची भेट घेऊन त्यांची परिस्थिती समजून घेतली .नंतर त्यांना पाठवण्या करिता मणिपूर येथे शिवसेना संपर्कात होती त्याशी संपर्क साधला तसेच महाराष्ट्र सरकार सोबत सुध्दा संपर्क करण्यात आला. परिस्थिती आणखी गंभीर होत होती,दोन्ही समूह एक दुसऱ्याच्या विरोधात सशस्त्र घेऊन उभे ठाकली होती,सर्व केंद्रीय विद्यापीठ,केंद्रीय संस्थान यांच्या प्रशासना सोबत चर्चा करून स्थानिक मणिपूर शिवसेना व अभाविप चा इंफाळ विभाग संघटन मंत्री अक्षय राजूरकर तथा कार्यकर्त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विमानतळावर पाठवले, अशातच असे लक्षात आले की पुन्हा दोन विद्यार्थी अडकले आहे, त्याला सुध्दा सोबत घेऊन जाण्याचा अक्षय चा आग्रह असल्या मणिपूर शिवसेनेचा एक कार्यकर्ता अक्षय च्या खांद्यावर बंधूक ठेवून जीवे मारण्याची धमकी देते,कारण त्याला तो परीसर त्या असूरक्षित वाटत होता, पण नंतर समजूत काढून त्या विद्यार्थ्यांना तिथून पाठवले जाते व त्या सर्व विद्यार्थ्यांची एका होटल मध्ये सुरक्षित ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना इंफाळ विमानतळावर सोडण्यात येते, व महाराष्ट्र शासनाने पाठवलेले विमान त्यांना गुवाहाटी मार्गे महाराष्ट्रात पोहचतो व ते विद्यार्थी सुटकेचा निःश्वास घेतात, परंतु विद्यार्थी परिषदेचा हा पूर्णवेळ कार्यकर्ता अक्षय अजून सुद्धा मणिपूर राज्यातील या हिंसेत बेघर झालेल्या लोकांनाभेटून त्यांच्या समस्या जाणून सेवा करत आहे तसेच मणिपूर चे राज्यपाल व अनेक प्रमुख मंत्री, राजकीय व्यक्ती यांच्या सोबत चर्चा करत शांततेची विनंती करत आहे.
त्यातच त्याला कळत की चुरचांदपुर जे हिंसेचे मुख्य केंद्र आहे,त्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी व सत्यता जाणून घेण्यासाठी तिथे जाण्याचा निर्णय घेतो, पण तिथे मैदानी भागातून कोणालाही जाण्याची परवानगी नसताना तसेच जिवाची हाणीचे, संकट असताना त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील एक सेवाभावी शिक्षिका जी तिथे शिकवण्यासाठी होती तिचा कॉल येतो व तिला परत घेऊन येण्या करीता हा तिथे जाण्याचा निर्णय घेता व तो मीडिया वाला बनून काही पत्रकार बंधूसोबत जातो. त्याला त्या स्थानावरून बिश्र्नुपुर जिल्या च्या सीमेपर्यंत एक मैतई व्यक्ती सोडतो,पण त्या पुढे त्यांना जाणे शक्य होत नाही तशातच 3 की.मी पायी चालून दुसऱ्या जिल्हा ची सीमा चुरचांदपुर मध्ये प्रवेश करतो, तिथे केंद्रीय दलाचे सुरक्षा रक्षक तसेच अधिकारी पुढे न जाण्याचा सल्ला देतात,पण ते नंतर स्वतःच्या जबाबदारी वर पुढे जाण्यासाठी परवानगी देतात व पुढे दुसऱ्या जिल्ह्यातील व्यक्ती सोबत मुख्य शहरात प्रवेश करतो, तिथे परिस्थिती सामान्य वाटत कारण दुसऱ्या समूहाच्या प्रत्येक व्यक्तीला हाकलून लावले होते, किंवा त्याना हिंसे मध्ये मारून टाकले होते त्या पेक्षा पण भयंकर म्हणजे तेथील दुसऱ्या समाजाचे घर JCB ने पुर्ण लेव्हल करून टाकले होते. अशा सर्व गोष्टीचा आढावा घेत, व तिथे हल्ल्यात जखमी व बेघर झालेल्या लोकांच्या भेटी घेत व स्वतः पत्रकार असल्याची खात्री पाठवून देत,नंतर पुण्याच्या त्या शिक्षकीला का करत व आपल्या ठिकाणीं बोलावून घेते व तिथून दोन व्यक्ती पुन्हा जिल्हा सीमे पर्यंत सोडून देतात, त्या शिक्षक महिलेला घेऊन 1 की.मी पायदळ प्रवास करत असताना, अचानक पुढील जिल्ह्यातील परिस्थिती बिघडल्याने पुन्हा हिंसाचार सुरू झाल्याचे कळते,तिथून पुढे 7 की. मी .केंद्रीय बळांचे सुक्षा रक्षक सोडणू देतात व तिथून अक्षय चा सहकारी प्राध्यापक घ्यायला येतो.बिष्णुपर जिल्ह्यातील अनेक लोक मध्यात रस्ता अडवत तपासणी करतात .परंतु सोबत त्याच समूहाचा व्यक्ती असल्याने ते सोडून देतात व अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि नागरिक यांच्यात चकमक होते,गोळीबार होते.जाळपोळ होते,अशा सर्व परिस्थिती चा सामना करत त्या महिला शिक्षिकेला इंफाळ ला पोहचवत पुढे ती विमानाच्या माध्यमातून ती शिक्षिका पुणे येथे परत येते. पण आज सुध्दा जवळपास 80 दिवस पूर्ण होऊन निरंतर शांतते करीता प्रयत्न करत आहे व निरंतर संकट असताना सुद्धा लोकांना होईल ती मदत करत केवळ महाराष्ट्र न्हवे तर अभाविप च्या माध्यमातून विविध राज्यातील 4 हजार विद्यार्थ्यांना सुरक्षित आपल्या स्थानावर पोहचवण्यासाठी काम करत आहे.

देश सेवेच्या कार्या करीता पाठवलेला कार्यकर्ता सकंटात पण आपल्या संघटनेच्या संस्काराणे कार्य करत आहे व मणिपूर च्या हिंसाचारात शांतिदुत बनून शांतता प्रस्तापित करण्याच्या प्रयत्नात अक्षय राजूरकर आहे। .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here