दिनांक:- 27 जुलै 2023
गडचिरोली:- आज देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते राजस्थानमध्ये 1.25 लाख पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राचे शुभारंभ करण्यात आले.
याच धरतीवर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम राबवण्यात आला.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या सहित गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी थेट लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले.
गडचिरोलीतील किसान समृद्धी केंद्रामध्ये प्रशांत वाघरे भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थित शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, अनिल पोहनकर, श्रीरंग पत रंगे, केशव निंबोड, विनोद देवोजवार,दीपक सातपुते ,अनिल तिडके,मंगेश रणदिवे, देवाजी लाटकर , राजू सेरकी, योगिता पिपरे, वैशाली नैताम , महिला पदाधिकारी व गडचिरोली जिल्ह्यामधील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.