गडचिरोली पोलिसांच्या धडक कारवाईत 2 लाख 70 हजारांची दारू जप्त!एक आरोपी अटकेत, दोन फरार, एक दुचाकीही जप्त

0
13

गडचिरोली:-गडचिरोली पोलिसांनी शहरातील अवैध दारू तस्कर विरोधात धडक कारवाई सुरु केली असून पोलिसांच्या रविवारी केलेल्या दोन कारवाईत एक दुचाकीसह 2 लाख 70 हजारांची देशी विदेशी दारू जप्त केली आहे रूपाश्री वैकटेश बैरवार महिलेला अटक केली तर कुख्यात दारू तस्कर वैकटेश बैरवार आणि गोपाल बावणे फरार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गडचिरोली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांनी शहरातील सर्वोदय वार्डातील कुख्यात दारू तस्कर वैकटेश बैरवार याच्या घरी रविवारी सकाळी धाड टाकली असता 2 पेटी इंग्रजी आणि 17 पेटी देशी दारू आढळून आल्या. पोलिसांनी या ठिकाणाहुन 1 लाख 45 हजार रुपयांची दारू जप्त करून वैकटेशची पत्नी रूपाश्रीला ताब्यात घेतले मात्र वैकटेश फरार झाला. दुसऱ्या कारवाईत रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांचा डिबी स्काट गस्तीवर असताना गोपाल बावणे ढीवर मोहल्यात दुचाकीने चिल्लर विक्रेत्यांना दारू सप्लाय करतांना आढळून आला मात्र पोलिसांना पाहताच गोपाल बावणे दुचाकी सोडून फरार झाला पोलिसांनी घटनास्थळावरून 10 पेटी देशी दारु सह एक दुचाकी असे एकूण 1 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. व्यंकटेश बहिरवार याला दारूचा किंग मेकर म्हटले जाते. यापूर्वी सुद्धा व्यंकटेश याच्यावर ठाण्यात कित्येक गुन्हे दाखल असून सुद्धा दारूचा मोठा व्यवसाय अजूनही जोमात सुरू आहे व छत्तीसगड राज्याची दारू आणून महाराष्ट्रात विकत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. व्यंकटेश याचा खूप मोठा व्याप असल्याचा दिसून येते
कारण काही वर्षा अगोदर मुरूमगाव ठाण्यात गुन्हा दाखल असून सुद्धा मुरूमगाव येथे दारूचा व्यवसाय खूप मोठ्या जोमात चालू असून व मोठा साठा मुरूम गावच्या आजूबाजूला ठेवून आजूबाजूच्या गावाला दारू पुरवण्याचा काम व्यंकटेश करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here