अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी कनेरीच्या उपसरपंचाने केला बायको नसल्याचा बनाव !

0
22

अतिक्रमणाच्या सबबीखाली अप्पर आयुक्त यांच्या न्यायालयाने अपात्रतेची कारवाई करून  दिला जोरदार धक्का

ग्रामपंचायत निवडणूक लढतांना नामर्निदशनपत्रात पत्नीच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता दाखवून सदर मालमत्ता शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आल्याने नमुद केले. तसेच पत्नीपासून आपण विभक्त राहत असल्याचे दाखविले. परंतू पत्नीपासून विभक्त राहत असल्याचा कोणताही कायदेशिर पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नाही. त्यामुळे शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरबांधकाम केल्याचा ठपका ठेवीत अप्पर आयुक्त यांच्या न्यायालयाने कनेरीचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रभाकर विष्णूजी लाकडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करून जोरदार धक्का दिला आहे.

कनेरी ग्रा.पं.चे सदस्य लाकडे यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी तक्रार गैरअपिलार्थी तथा ग्रा.प.सदस्य अजय संजय गेडाम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकारी यांनी प्रकरण क्रमांक 21 एमआरसी /81/ 2021- 22 मध्ये 12 मे 2021 रोजी च्या निर्णयान्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 अन्वये आदेश पारित करून लाकडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली होती. त्यामुळे लाकडे यांनी अप्पर आयुक्तांकडे धाव घेऊन अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अपील दाखल केले होते.

प्रकरणाची अंतिम सुनावनी 3 जुलै 2023 रोजी घेण्यात आली. सुनावनीसाठी अपिलार्थी व गैरअपिलार्थी यांचे अधिवक्ता उपस्थित होते. दोन अधिवक्त्यांचा युक्तीवाद ऐकूण घेण्यात आला. या प्रकरणातील अपीलार्थी आणि गैरअपिलार्थी यांची दाखल केलेला लेखी युक्तीवाद व दस्तावेज तसेच तहसीलदार गडचिरोली यांचा अहवाल आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे अवलोकन करण्यात आले. अवलोकन केल्यानंतर अपीलार्थी तथा ग्रा.पं.सदस्य लाकडे यांनी तलाठी साजरा क्र.14 अंतर्गत कनेरी येथील शासकीय भूमापन क्र.43, आराजी 2.75 हे.आर. पैकी 2461 चौरस पफुट जमिनीवर अतिक्रमण करून घरबांधकाम केल्याचे स्पष्ट झाले. तसेच भुमापन क 43 ही जागा शासकीय असून मोठया झाडाचे जंगल असल्याचे नमुद असणे आणि अपिलार्थी लाकडे हे आपल्या पत्नीपासून वेगळे राहत असल्याचा कोणताही कायदेशिर पुरावा सादर करून शकले नाही. त्यामुळे अप्पर आयुक्त यांच्या न्यायालयाने  जिल्हाधिकारी गडचिरोली यांचा 12 मे 2021 चा पारित केलेला आदेश कायम ठेवीत अपिलार्थी लाकडे यांचे अपील फेटाळून लाऊन जोरदार धक्का दिला आहे. गैरअपिलार्थी यांच्या बाजूने अधिवक्ता रघुविर बावनकुळे, प्रितम ठाकरे व जितेश गोरे यांनी युक्तीवाद केला.

सेवानिवृत्त होताचा लाकडे यांची राजकारणात उडी
अपिलार्थी प्रभाकर लाकडे हे 1984 पासून शिक्षक म्हणून शासकीय सेवेत रूजु झाले. ते ऑगस्ट 2019 मध्ये मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सन 2021 मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि प्रभाग क्रमांक 3 मधून ते सर्वसाधारण गटातून बहुमताने निवडून आले त्यानंतर त्यांची उपसरपंच पदावर वर्णी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here