दहीहंडीचा हा खेळ,खेळाडूंनी जोखीमदारीने व सावधगिरीने खेळावे -खासदार अशोक नेते

0
14

दिं.०७ सप्टेंबर २०२३ गडचिरोली:-विश्व हिंदू परिषद, बजरंग दल नगर गडचिरोली च्या वतीने दहीहंडी उत्सव अभिनव लॉन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठया उत्साहाने,आनंदाने, बालगोपाल युवक वर्ग मोठया संख्येने सहभागी होऊन दहीहंडी हा उत्सव साजरा करतात पण दहीहंडी उत्सवाचा खेळ हा इतर खेळांपेक्षा हा वेगळा खेळ आहे,एकमेकांच्या सहाय्याने खेळ खेळला जातो. हा खेळ खेळतांना पाण्याचा वर्षाव केला जातो त्यामुळे जोखमीचा खेळ आहे. यासाठी सावधगिरीने खेळ खेळावे.हया खेळात खेळाडूंना फार मोठ्या प्रमाणात इजा व दुखापत सुद्धा होते.याकरिता मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जखमींना दहा लक्ष रुपयांचा विमा कवच ची घोषणा केलेली आहे.तरीपण दहीहंडी हा खेळ खेळतांना खेळाडूंनी , जोखीमदारीने, सावधगिरीने,खेळ खेळावे,असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी केले.
यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,सामाजिक नेते रामायणजी खटी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिडूरकर साहेब, गडचिरोलीचे थानेदार अरुणजी फेगडे साहेब,भाजपाचे जेष्ठ नेते रमेशजी भुरसे,उपाध्यक्ष भारत खटी,माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,नितेश खडसे,अनिल तिडके,रोशन आखाडे, गजेंद्र डोमळे,जित मंडल, राकेश नैताम,हर्षल गेडाम,सुभाष उपलवार,रुपराज वाकोडे,पवन वासेकर, विक्की कोत्तावार,तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने युवकवर्ग, बालगोपाल, उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here