कंपनीचे अधिकारी यांचे हस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण
एटापली : एटापली तालुका स्थळापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या हेडरी येथे दिनांक 06 सप्टेंबर 2023 रोजी पासुन भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, एल. साई कुमार, भोलू भाऊ, संजू चांगलानी, रोमीत टोमबारलावार उपसरपंच राकेश कावडो, प्रमुख अतिथी सौरभ कावडो पोलीस पाटील , प्रतिष्टीत नागरिक, खेळाडू व गावकरी उपस्थित
या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक क्रिकेट क्लब बांडे , तर द्वितीय क्रमांक युवा क्लब हेडरी , तर तृतीय क्रमांक पेठा आणि चौथा पुरसलगोडी यांनी अनुक्रमे प्रथम बक्षीस 25000 द्वितीय बक्षीस 20000 आणि तृतीय बक्षीस 15000.
तसेच चौथा 10000रुपयांचे पारितोषिक मिळविले.सदर बक्षीस वितरण एल. साई कुमार एच. आर. हेड,भोलू भाऊ सोमनानी जी संजू भाऊ चांगलानी , रोमीत भाऊ तोमंबर्लावर , उप सरपंच राकेश कावडो,दुलासा मट्टामी, साधू गुंडरू,प्रसाद भाऊ नामेवार,कुंदन असूटकर, मिथुन जोशी, स्वप्नील वैरागडे,दिलीप बुराडे, स्पोर्ट अधिकारी यांच्या हस्ते विजेत्या संघांना प्रदान करण्यात आले.
यावेळी क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनात मान्यवरांनी सांगितले की, खेळाबरोबरच आपले आरोग्य आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवून, योग्य तो समन्वय घडवून आणावा असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
सदर स्पर्धा दिनांक 08सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाल्याने बक्षीस वितरण सोहळा अधिकारी, खेळाडू प्रशिक्षक व ग्रामस्थ यांच्या प्रमुखउपस्थितीत पार पाडले.