सेवा पंधरवाडा अंतर्गत येणारे उपक्रम प्रत्येक बुथांवर राबवा:- भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे बुथ पालकांना आव्हान

0
10

दिनांक :- 10 सप्टेंबर 2023

गडचिरोली:- माननीय खासदार श्री.अशोक जी नेते साहेब व मा.आमदार श्री.देवराव होळी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये गडचिरोली विधानसभा बूथ पालक मेळावा पत्रकार भवन गडचिरोली येथे संपन्न झाला.
यावेळी मंचावर प्रदेश संघटन सदस्य तथा जिल्हा महामंत्री श्री. रवीजी ओल्लारवार,गडचिरोली चिमूर लोकसभा समन्वयक श्री. प्रमोदजी पिपरे,लोकसभा विस्तारक तथा ज्येष्ठ नेते श्री.बाबुरावजी कोहळे,महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी सौ.योगिताताई पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे उपस्थित होते.
या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे यांनी मार्गदर्शन करताना बोललेत की,देशाचे लाडके पंतप्रधान श्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिवस येत्या 17 सप्टेंबर 2023 ला असून त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये सेवा पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा उपक्रम संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा राबवायचं आहे.
सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत येणारे कार्यक्रम.
आयुष्यमान भारत कार्डअभियान_
अंतर्गत आयुष्यमान कार्ड नोंदणी दिनांक 17 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर पर्यंत प्रत्येक बुथ वर राबवणे.
प्रदर्शनी अभियान
माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेले कामाची प्रदर्शनी प्रत्येक बुथ वर करणे.
वस्ती संपर्क अनु.जाती,अनुसूचित जनजाती,अल्पसंख्यांक अभियान
केंद्र सरकारने अनु.जाती, अनुसूचित जनजाती,अल्पसंख्यांक जाती साठी नऊ वर्षांमध्ये केलेल्या कामांची माहिती व योजनांची माहिती 26 सप्टेंबर ते 1 आक्टोंबर पर्यंत वस्ती संपर्क अभियानांतर्गत प्रत्येक बुथ वर राबवणे.
स्वच्छता अभियान
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त स्वच्छता अभियान 25 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर पर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक बुथ वर राबवणे.
रक्तदान, आरोग्य शिबिर अभियान
देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते दोन आक्टोंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करने.
पंडित दीनदयाळ जयंती व बूथ संपर्क अभियान
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे 25 सप्टेंबर 2023 ला जयंती असून या जयंतीदिनानिमित्त बुथ संपर्क,संपर्क से समर्थन,अभियान घर घर चलो अभियान प्रत्येक बुथवर राबवणे.
बुथ सशक्तीकरण अभियान
दि.२५ सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सर्व बुथांचे समित्या तयार करून बुथ सशक्तिकरण करणे.
सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत येणारे उपक्रम असून हे उपक्रम प्रत्येक बुथवर राबवा असे आवाहन माननीय जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे यांनी केले.
या प्रसंगी गडचिरोली विधानसभा तील सर्व बूथ पालक व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here