संपूर्ण देशाला एकत्र जोडण्याचं काम -पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांनी केल-चित्राताई वाघ भाजपा प्रदेशाध्यक्ष

0
5

 

गडचिरोली:दि.१३ सप्टेंबर

गडचिरोली:-डचिरोलीत भाजपच्या ‘घर चलो अभियाना’त प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व खासदार अशोकजी नेते यांनी सहभागी होऊन घर चलो अभियानाची दुकानदारांना वाटली पत्रके,

गडचिरोली भाजपच्या महिला आघाडीच्या देशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ‘मेरी माटी मेरा देश’ आणि ‘घर चलो अभियाना’त मंगळवारी गडचिरोली शहरात प्रत्यक्ष सहभाग घेतला. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात जाणार असून या दौऱ्याची सुरूवात माझ्या आवडत्या गडचिरोली जिल्ह्यातून करत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
याशिवाय जनसंवाद कार्यक्रमांतर्गत भाजपच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनात भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी बोलतांना संपूर्ण देश पातळीवर मिट्टी को सलाम, विरोंको वंदन,मेरी माटी मेरा देश या माध्यमातून संपूर्ण देशाला एकत्र जोडण्याचं काम -पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांनी केल.
प्रत्येकांनी आपल्याला घरोघरची माती जमा करुन देश सेवेचा सन्मान व देश सेवा निर्माण करण्यासाठी अभियानात सहभागी व्हावे व महा जनसंपर्क अंतर्गत घर चलो अभियान उपक्रम राबवा,पंतप्रधानांनी नव वर्षात केलेले कार्य व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा व महिलांचा सन्मान करा, दिवसेंदिवस महिलेवरील होत असलेले अन्याय खपवून घेणार नाही.असे प्रतिपादन या महिला जनसंवाद मेळाव्या प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.

खासदार अशोकजी नेते यांनी महिला भगिनींना मार्गदर्शन करतांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांनी नववर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा गौरव व जनकल्याणासाठी केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचत घर चलो अभियान,मेरी माटी मेरा देश या अंतर्गत प्रत्येक घराघरांमध्ये लोकसभा क्षेत्रातील केलेल्या कामाचे पत्रक व केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवा,असे प्रतिपादन या महिला जनसंवाद मेळाव्या प्रसंगी खासदार अशोक जी नेते यांनी केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी बोलतांना चित्राताई यांच नाव वाघ आहे.तसेच माझे ही नाव सुद्धा वाघ..रे आहे.
हे दोन्ही वाघ एकत्र येऊन हा बहीण-भावाच्या मिलनाचा प्रसंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडुन आल. मॅं! जिजाऊ यांनी महिलांचा सन्मान करण्यासाठी शिवबाला जशी शिकवण दिली. संस्कार घडवला तसेच संस्कार महिला भगिनींनी घडवावे.असे उत्कृष्ट वक्तव्य केले.

महीला जनसंवाद मेळाव्याला आमदार डॉ. देवराव होळी,महीला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्का ताई आत्राम, शालीनी डोंगरे यांनी सुद्धा उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक_ रेखा डोळस प्रदेश चिटणीस यांनी तर संचालन योगीता पिपरे भाजप महिला प्र.जिल्हाध्यक्ष यांनी केले.

खासदार अशोक जी नेते यांच्या निवासस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांचे स्वागत

गडचिरोलीत आगमन होताच भाजप व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन परिवारासह स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम, प्रदेश चिटणीस रेखा डोळस, महिला प्र.जिल्हा अध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा सचिव गिता हिंगे, प्रदेश सरचिटणीस (एस. टी.मोर्चा) प्रकाश गेडाम, तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते.
घर चलो अभियानाची पत्रके वाटप व रॅलीचे आयोजन

बाजार मार्केट पासून हनुमान मंदिर शहराच्या मार्केट परिसरात चित्राताई वाघ व खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, यांनी पदाधिकाऱ्यांसोबत पायी फिरून मार्केट परिसरात दुकानदार, व्यापाऱ्यांना सरकारने केलेल्या कामाची पत्रके वाटली.

यावेळी खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, महिला प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, महिला प्रदेश चिटणीस रेखा डोळस, जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, प्रदेश सरचिटणीस (एस.टी. मोर्चा) प्रकाश गेडाम, महिला प्र.जिल्हा अध्यक्ष योगीता पिपरे, ओबीसी प्रदेशच्या संगीता रेवतकर, महिला आघाडीच्या पदाधिकारी शालिनी डोंगरे, माजी जि.प.सदस्य लता पुंघाटी, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, कविता उरकुडे, जिल्हा सचिव गिता हिंगे, माजी सभापती रंजिता कोडापे, रहिमा सिद्धिकी, रोशनी पारधी, पल्लवी बारापात्रे तसेच या जनसंवाद मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

जनसंवाद महीला मेळाव्याला अनेक पहिलांनी भाजपा वर विश्वास ठेऊन प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ व खासदार अशोकजी नेते जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here