वैरागड:- महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी वैरागड येथे प्रथम आगमना प्रीतर्थ भोलू भाऊ सोमनानी मित्रपरिवार व गावकऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत व नागरी सत्काराचा कार्यक्रम भोलूभाऊ सोमनानी यांच्या घरासमोरील भव्य पटांगणात आयोजित केलेला आहे
गेल्या 20 वर्षा पासून वैरागड येथील भोलुभाऊ सोमनानी यांच्या घरच्या गणपती चे आरमोरी तालुक्यात महत्व असून 10 दिवस विविध उपक्रमांनी गणेश उत्सव साजरा केला जातो शेवटच्या दिवशी 10 ते 15 हजार भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते ही प्रसिद्धी ऐकून महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.राजे धर्मराव बाबा आत्राम गणपती दर्शन व सदिच्छा भेट देण्याकरिता भालुभाऊ सोमनानी यांचे घरी येत असल्याने समस्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आयोजकांनी आवाहन केले आहे