अहेरी:-समाजात एकोपा निर्माण व्हावा आणि बंधुभावाने उत्सव साजरा करता यावे यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव राबविण्यास प्रारंभ केले. संपुर्ण देशभरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या गुण्यागोविंदाने साजरा केला जातो. त्यात अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. असाच अनोखा उपक्रम रायगट्टा गावात बघायला मिळाला आहे.
नव्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अहेरी तालुक्यातील रायगट्टा गावातील युवकांनी एकदंत गणेश मंडळ तयार केला. गणेश चतुर्थी पासुन ते विसर्जनापर्यंत प्रत्येक दिवशी महाप्रसाद वाटपाचा गावात अभुतपुर्व प्रयोग एकदंत गणेश मंडळाने केला असुन दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपुन गावात स्वच्छता मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. एकदंत गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व गावातील गणेश भक्तांनी आज सकाळपासुन गावातले सर्व रस्त्यांची सफाई केली. सदर उपक्रमात एकदंत गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत निलमवार, उपाध्यक्ष मोहन कोलावार, सचिव गणेश मोहुर्ले, मोगली कोलावार, राजेंद्र कर्णेवार, संपत चिटकाला, महेश जाकेवार, नागराज अल्लमवार, अनिल जाकेवार, तिरुपती अल्लमवार, श्रीनिवास जाकेवार, सत्यम भंडारवार, सत्यनारायण येतमवार, राजेश कर्णेवार, चंद्रराव अल्लमवार, माधव कुळमेथ, नारायण चिटकाला, शैलेष तलांडी, श्रीशांत मोहुर्ले, तिरुपती पेद्दिवार, साई पत्तीवार, संपत पत्तीवार व इतर गणेश भक्तांनी स्वच्छता उपक्रम यशस्वी करण्यास सक्रिय सहभाग घेतला.