आरोग्य हिच संपत्ती- खा.अशोक नेते.बुद्ध विहार सोनापुर कॉम्प्लेक्स एरिया गडचिरोली येथे आरोग्य तपासणी शिबिर तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

0
20

भाजपतर्फे मा.पंततप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त बुद्ध विहार सोनापुर कॉम्प्लेक्स एरिया येथे “सेवा सप्ताह पंधरवाडा” कार्यक्रम संपन्न

दि.:-२९ सप्टेंबर

गडचिरोली :- मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा सप्ताह पंधरवाडा” या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्थानिक बुद्ध विहार सोनापुर कॉम्प्लेक्स एरिया येथे आरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी व वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना आरोग्य हीच संपत्ती आहे.नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सेवा पंधरवाडा” या निमित्ताने नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने शिबिरात आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावा.असे अवाहन यावेळी केले.

आज आयोजित केलेला आरोग्य शिबिर कार्यक्रम हा बुद्ध विहार मध्ये होतोय याचा मला आनंद आहे.कारण हा बुद्ध विहार माझ्या प्रयत्नाने माझ्या विकास निधी अंतर्गत सभागृह दिलेला आहे याचा सुद्धा लाभ चांगल्या पद्धतीने घ्यावा असे यावेळी खासदार अशोक नेते यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, यांच्या शुभहस्ते तर लोकसभा ‌समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,जेष्ट नेते रमेश भुरसे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

याप्रसंगी खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी बीपी,शुगर ची तपासणी करून कार्यक्रमाचा शुभारंभ करत आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करून कार्डचे वितरण केले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके,शहराध्यक्ष कविताताई उरकुडे,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम,गीता बैस,अर्चना निंबोड, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री आशिष रोहनकर अनु.जाती मोर्चा चे जिल्हा महामंत्री जनार्धन साखरे,शहर महामंत्री केशव निबोंळ,शहर महामंत्री विवेक बैस,बुद्ध विहार समिती चे अध्यक्ष खोब्रागडे जी, गजेंद्र डोमळे, आरोग्य सेविका,आशा सेविका, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बुद्ध विहार कमेटी च्या वतीने खासदार अशोकजी नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र डोमळे,प्रस्तावना केशवजी निबोंळ व आभार प्रदर्शन विवेकजी बैस यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here