गडचिरोली – गडचिरोली येथील इंदिरा गांधी शासकीय विश्राम भवनात दि. 4/10/2023 ला जेडियु पक्षाची बैठक घेण्यात आली. यावेळी जेडियु पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अतुलभाऊ देशमुख अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळेस प्रदेश सचिव उमेशभाऊ ऊईके, जिल्हाध्यक्ष गोकुलदास झोडगे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना पक्षाचे ध्येय धोरण व आगामी काळात येणाऱ्या निवडणूका संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी अर्चना पोटवार, वैशाली चन्नावार, दिपक दरडे, हेमःत बाळेकरमकर यांनी जेडियु पक्षाच्या विचारधारेवर विश्वास पक्ष प्रवेश केला. त्याना महिला जिल्हाध्यक्ष, महिला तालुका अध्यक्ष, गडचिरोली तालुका उपाध्यक्ष, तालुका सचिव आदि पदांची जिम्मेदारी देण्यात आली. बैठकीला जेडियु पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कामडी, जिल्हा महासचिव मोहन दिवटे, तालुका अध्यक्ष जाविद उंदीरवाडे, ता. उपाध्यक्ष बाळा लाडवे, आरमोरी ता. अध्यक्ष वामण राऊत, शहर अध्यक्ष प्रितम साखरे, शहर सचिव छोटू पठाण, मंगेश मराठे, रुपेश आसूटकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.