यावर्षीही टी पॉइंट चौकात रास-गरबाची धमाल! 14 वर्षांपासून जय माँ शेरावली दुर्गा उत्सव मंडळ तर्फे राबविली जातात विविध सामाजिक उपक्रम

0
18

14 वर्षांपासून जय माँ शेरावली दुर्गा उत्सव मंडळ तर्फे राबविली जातात विविध सामाजिक उपक्रम

नवरात्र सुरू होताच सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण होते. गडचिरोली शहरातही या दिवसात भाविक मातेच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसतात. जिल्हा मुख्यालयात मातेच्या दर्शनाने भक्तिभावाने रास गरबा साजरा होत आहे. दरम्यान, शहरातील टी पॉइंट चौकातील जय माँ शेरावली दुर्गा उत्सव मंडळाचा रास गरबा दर वर्षी प्रमाणे यावर्षीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे . गेल्या 14 वर्षांपासून मंडळातर्फे दुर्गा उत्सव साजरा केला जात आहे या उत्सवादरम्यान रक्तदान शिबिरासह ग्रामस्वच्छता अभियान राबवून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे उल्लेखनीय कार्य हे मंडळ करत आहे. हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सचिन कुंभारे, रवी दोनाडकर, पंकज घोरमोडे, विजय माधमवार, आशिष चिवणकर, पवन पोटे, राज कौशिक आदी व दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here