सोनार समाज सेवा संस्था, गडचिरोलीच्या वतीने होणाऱ्या श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या तयारीसाठी बैठक संपन्न

0
278

गडचिरोली:-सोनार समाज सेवा संस्था गडचिरोली च्या वतीने आज बैठक घेण्यात आली या बैठकीला मुख्य समिती, महिला कार्यकारिणी आणि युवा कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी पंचवटी नगर आय टी आय चौकातील समाजाच्या नियोजित जागेवर साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली.

बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, जबाबदाऱ्या आणि कार्यविभाजन यावर चर्चा झाली. सर्व सदस्यांनी आपापल्या भूमिका आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे ठरविले.

सोनार समाज सेवा संस्थेचे सचिव प्रा. राकेश इनकने, कोषाध्यक्ष रमेश भरणे, सदस्य सुरेश भोजापुरे, सहसचिव तानाजी पालकर, यादव हर्षे, पंकज हर्षे, टीकाराम करंडे, अशोक खरवडे, त्रिमूर्ती डोमळे, महिला अध्यक्षा अल्का खरवडे, माया भोजापुरे, शालिनी भरणे, सविता डोमळे, अश्विनी चावरे, स्नेहा डोमळे, मनीषा पालकर, दर्शना डोमळे,वैशाली भजने,खरवडे ताई आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

सोनार समाज सेवा संस्था, गडचिरोलीच्या वतीने सर्व समाजबांधवांना आवाहन करण्यात येते की, १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here