एटापल्ली: तालुक्यातील मुख्य चौकात वीर शहीद श्रीनिवास दंडीकवार यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला विविध स्तरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
कार्यक्रमास एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, एटापल्ली शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुकडे, पोलीस उपनिरीक्षक मात्रे, लायड्स मेटल्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक व्यापारी वर्ग तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वीर शहीद श्रीनिवास दंडीकवार यांच्या बलिदानाला वंदन केले आणि त्यांच्या योगदानाचा गौरव केला. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धारही करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी मेणबत्त्या लावून आणि दोन मिनिटांचे मौन पाळून वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण केली.