सेवा सहकारी संस्था कोजबीच्या अध्यक्षपदी रामदास डोंगरवार यांची बिनविरोध निवड

0
21

वैरागड वार्ताहर= आरमोरी तालुक्यातील सेवा सहकारी संस्था कोजबी र. नं. 264 ची अध्यक्ष उपाध्यक्ष ची निवड सभा समाज मंदिर कोजबी येथे आज दिनांक 26 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता घेण्यात आली यात अध्यक्ष म्हणून रामदास डोंगरवार तर उपाध्यक्षपदी दिनेश बनकर यांची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. यापूर्वी 13 सदस्य संख्या असलेल्या सेवा सहकारी संस्था कोजबीच्या संचालकांचीही बिनविरोध निवड करण्यात आली होती. या सभेला 13 सदस्यांपैकी अकरा सदस्य उपस्थित होते त्यात मनोहर मूल्येवार भगवान मोहिते सुरेश दुमाने सुनील ताडाम कृपानंद सोनटक्के बाबुराव मशाखेत्री श्रीहरी बोरकर मनोहर गेडाम रसिका घुटके रामदास डोंगरवार दिनेश बनकर उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून आर.जी. उसेंडी तसेच संस्थेचे सचिव भास्कर हुमणे यांनी निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष रामदास डोंगरवार उपाध्यक्ष दिनेश बनकर यांनी सर्व संचालकांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here