विधानसभा निवडणूकीत रेती तस्कर, दारू तस्कर सक्रिय

0
13

विधानसभा निवडणूकीत रेती तस्कर, दारू तस्कर सक्रिय
विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्यात पोहचला आहे. उमेदवारांची प्रचारात दमछाक होत आहे. आपलाच उमेदवार, आपलाच नेता विजयी व्हावा यासाठी कार्यकर्ते जीवांचे रान करीत आहे. कार्यकर्त्यासोबतच, उमेदवारांना अर्थपुरवठा करणारे, नेत्यांचे आशिर्वादाने रेती तस्करी करणारे, दारू तस्करी करणारेही सक्रीय झाले असून, आपला नेता निवडूण आला नाही तर, आपल्या धंद्याचे काय होईल ही भिती या तस्कारात निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्हयातील एक मोठा रेती तस्कर अजयपूर/चिचपल्ली येथे असून, रात्रौ—बेरात्रौ हा तस्कर अंधारी नदीची वाट लावून, रेती उपसा करीत असतो. बल्हारपूर विधानसभेत निवडणूकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उभे असलेला उमेदवार हा या रेती तस्कराचा पाठीराखा आहे. मात्र तिरंगी लढतीत नेता, पराभवाच्या छायेत असल्यांने, या रेती तस्कराचे धाबे दणाणले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला नेता विजयी झाला पाहीजे यासाठी हा रेती तस्कर दिवसरात्र ‘यंदा ———, यंदा ————’ गाणे गात आहे. मूल येथे सुधीर मुनगंटीवार यांची आदिवासी समाजाच्या सभेसाठी आदिवासींनी हजेरी लावू नये याकरीता या रेती तस्करांने चिमढा परिसरात या आदिवासीकरीता मटन पार्टीचे आयोजन केल्याची चर्चा आहे. मूलचेही बरेच रेती तस्कर आजवरच्या उपकाराला जागत प्रामाणीक कामे करतांना दिसत आहे. रेती तस्करांसोबतच दारू तस्करही सक्रिय झाले असून, आपल्या पाठीराख्या नेत्यांसाठी फुकट दारू, शेवटच्या दिवसात वाटप करावयाच्या दारूची सोय हे तस्कर करीत आहे.
ब्रम्हपुरी विधानसभा तर रेती—दारू तस्कारांचा गढ समजला जातो. या मतदार संघात रेती आणि दारू तस्करीला राजाश्रय प्राप्त झाला आहे. जे रेती—दारू तस्करी करतील तेच भाऊचे खास कार्यकर्ते, तेच गावचे नेते समजले जातील अशी परिस्थिती आहे. चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी असतांना, या दारूबंदीला छेद देण्यांचा काम याच मतदार संघातील नेते उर्फ भाउनी केल्यांचे सर्वश्रृत आहे. याच भाउनी अवैद्य दारू विक्रेत्यांचे कसे नेटवर्क तयार केले, पोलिसांपासून ते सर्वांना कसे हप्ते द्यायचे याची कार्यपध्दती सांगणारे आॅडीओही प्रचंड वायरल झाले होते. याच मतदार संघातील रेती तस्करीमुळे वैनगंगा नदीची वाट लागली, व्याहाड—मुडझा—गांगलवाडी रस्त्याचे हाल झाले. मतदारांकडून यामुळे या भाउला फटका देण्यांची तयारी असली तरी, रेती तस्करांकडून या मतदारांना ‘मॅनेज’ करण्यांचा प्रयत्न चालू आहे.
बल्हारपूर—ब्रम्हपुरी मतदार संघातील हे दोनही ‘भाऊ’ उमेदवार, एकमेकांचे गुरू—चेले आहेत. हे निवडूण आले तर, या दोनही मतदार संघात गुन्हेगारी प्रचंड वाढून, वाट लागेल अशी मतदारात भिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here