गडचिरोली: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी डॉ. सोनल चेतन कोवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
डॉ. सोनल चेतन कोवे या उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनीलजी तटकरे, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा. प्रफुल्लभाई पटेल,अहेरीचे आमदार राजे डॉ. धर्मरावबाबा यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना बळकट करण्यासाठी कार्यरत राहतील. पक्षाच्या ध्येय-धोरणांचा प्रसार करत महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना न्याय मिळण्याची शक्यता असून, संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.