सुरजागड इस्पात कंपनीच्या पर्यावरण विषयक जनसुनावणीला मोठा प्रतिसाद,खेळी मेळीच्या वातावरणात जनसुनावणीला एकमताने केला पारित.

0
22

गडचिरोली (दि. २५ मार्च २०२५): आदिवासी बहुल, उद्योग विरहित जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह आधारित कंपन्या स्थापन होत असून दिनांक 25 मार्च 2025 रोजी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पर्यावरण विषयक जन सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विषयक जनसुनावणीची बैठक पार पडली. या बैठकीत वडलापेठ व परिसरातील नागरिकांनी सुरजागड इस्पात कंपनीला समर्थन दिले. मात्र, नागरिकांनी कंपनीला रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि इतर पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याची सुचना केली.

बैठकीस अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर सोनल कोवे, भाजप नेते रवी ओलालवार, बबलू हकीम, हनुमंत मडावी, डॉक्टर चरणजीत सिंग सलुजा, तनुश्री आत्राम, हर्षवर्धन बाबा आत्राम. ग्रामपंचायत खमणचरुचे सरपंच सायलू मडावी. राम लुक उडम. येथे पराग ओलालवार. तुळशीराम मडावी. शशिकला काटमवार. दिलीप चौधरी. निरंजन दुर्गे. माजी सरपंच रमेश पेंदाम. माजी सरपंच रमेश मडावी. संतोष आत्राम. ललिता मडावी. सोनाली कोवे. अमृता रॉय. आणि उपस्थित होते.
या जनसुनावणीत ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांचे महत्त्वपूर्ण विचार आणि मते मांडली गेली, ज्यात कंपनीने सामाजिक उपक्रमांवर विशेष लक्ष दिले पाहिजे, असे सांगण्यात आले.

जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार , चांगले शिक्षण ,चांगले आरोग्य अश्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि त्या समस्या सोडविण्याबाबत सुरजागड इस्पात कंपनीला जागरूक केले. यामुळे कंपनीला सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here