अहेरी (दि. २५ जून): आलापल्ली वरून वेलगुल मार्गे मुलचेरा दिशेने जात असलेल्या एसटी महामंडळाच्या बसने एका पायदल स्वार व्यक्तीस धडक दिल्याची गंभीर घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की पायदल स्वार व्यक्ती गंभीर जखमी झाला.
ही दुर्घटना मधुमडगु गावाजवळ, सुमारे एक किलोमीटर अंतरावर घडली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार, एसटी बस ही अतिशय सुसाट वेगाने जात होती. या वेगामुळेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अपघातग्रस्त व्यक्तीस तात्काळ ॲम्बुलन्सद्वारे अहेरी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, एसटी महामंडळाने बसगाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, तसेच चालकांनी अधिक काळजीपूर्वक वाहन चालवावे,व जखमी व्यक्तीला एस टी महामंडळाने तात्काळ मदत करावी अशी जोरदार मागणी सामान्य नागरिकांमध्ये होत आहे.










