एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली ते येलचील या रोडवर नाग मंदिर जवळ कार आणि मोटार सायकलचा भीषण अपघात.. ; मोटर सायकल स्वार जागीच ठार..

0
3019

एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा गावाजवळ एटापल्ली ते येलचील रोडवरील नाग मंदिर जवळ कार आणि मोटर- सायकलचा अपघात झाल्यामुळे मोटार सायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून सदर घटना घडल्यानंतर उघडकीस आली आहे. अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव बबलू गोटा राहणार तुमरगुंडा असे असून हा अपघात एवढा भयंकर होता की कारच्या धडकेत मोटार सायकल स्वार जागीच ठार झाला आहे. सदर गाडी चंद्रपूर जिल्ह्याच्या पासिंगची असून एम. एच. ३४- सी. जे. ७४०३ असं अपघात करणाऱ्या (कार) गाडीचा नंबर आहे. आज सायंकाळी च्या सुमारास असल्यामुळे अपघातग्रस्त जागेवर पोलीस प्रशासनाचे कोणतीही अधिकारी आले नसल्याचे कळते आहे. त्यामुळे पुढील तपास पोलीस करतील असा अंदाज वर्तवले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here