भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवार वैरागड, यांच्या वतीने वैरागड येथे पाणपोईचे उद्घाटन ; महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजन.. .

0
42

आरमोरी / वैरागड :- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वैरागड येथील इंदिरा चौक, बाजार टोली येथे भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवाराच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
आरमोरी तालुक्यातील वैरागड हे परिसरातील प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या पाणपोईचे उद्घाटन शितलताई सोमनानी सामाजिक कार्यकर्त्या, तथा माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव गेडाम यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास सरपंच संगीता पेंदाम, कोजबीच्या माजी सरपंच वैशाली डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य आदेश आकरे, संगीता मेश्राम, प्रतिभा बनकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विमल बारस्कर, रुचित बोधनकर, दिलीप सहारे, भोलू भाऊ सोमनानी मित्रपरिवार वैरागडचे सर्व नवतरुण कार्यकर्ते तसेच वैरागड येथील बहुसंख्य नागरिक उपस्थिती होते.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम म्हणून त्याचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार रामदास डोंगरवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here