महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात ‘आर—आर’ गॅंगचा अडथळा

0
28

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात ‘आर—आर’ गॅंगचा अडथळा
बल्हारपूर विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषभाऊ रावत यांनी प्रचाराचा चांगलाच धडाका लावला आहे. मूल तालुका हा रावत यांचा बालेकिल्ला आहे. याच तालुक्यात संतोष रावत यांना नगरसेवक ते जिल्हा मध्यवर्ती बॅंक अध्यक्ष बनता आले. त्यांचा मोठा चाहता वर्ग या तालुक्यात असल्यांचे त्यांनी विजयाची भिस्त याच तालुक्यात आहे.
भाजपाचे वतीने सुधीरभाऊ मुनगंटीवार रिंगणात आहे. अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे या देखिल रिंगणात आहेत. त्यांनाही मूल तालुक्यातील माळी समाज आपल्या बाजूने राहील याची खात्री आहे. मूल तालुक्यात संतोषभाऊ रावत आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना समान संधी आहे. मात्र संतोषभाऊकडे, त्यांची निवडणूक सांभाळणारी ‘आर—आर’ गॅंग त्यांचे विजयात अडथळा निर्माण करीत आहे.
या ‘आर—आर’ गॅंग बद्दल मूल तालुक्यातील जनतेचे मत अजीबात चांगले नाही. धाक दाखविणे, धमक्या देणे, प्रसंगी मारहाण करणे असे कामे या गॅंगचे लोक करीत असतात. त्यामुळे रावत विजयी झाले तर मूल तालुक्यात गुंडागीरी वाढेल अशी भिती मतदारात असल्यांने, रावत पेक्षा मुनगंटीवार बरा असे मतदारांचे म्हणणे आहे. ही ‘आर—आर’ गॅंग, गुंडगीरीसोबत जमिनी लुटणे, आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर धमक्या देवून कब्जात घेणे, त्याचे प्लॉटपाडून विकणे व आदीवांसीना लुबाळण्याचे कामे करीत असतात. रावत विजयी झाल्यास, अशा आदिवासींना त्यांच्या जमिनी सुरक्षीत ठेवणे अडचण जाणार आहे. कुणाच्याही जमिनी, आपल्याच असल्यांचे सांगून भोळ्या भाबळ्या जनतेला विकून टाकणे पैसे घेवून, तुमचे तुम्ही पहा म्हणणे असे धंदे ही ‘आर—आर’ गॅंग करीत असते. रावत विजयी झाल्यास, ही ‘आर—आर’गॅंग सांगीतले कि, रजिस्ट्रार कार्यालयात जावून आंगठा मारणे हेच करावे लागणार असल्याची भिती मूल वासीयांत आहे. या गॅंग सोबतच, मूल शहरात डुक्कराचा हैदोस आहे. या डुक्कराचे मालक असलेले समुदायाची ‘दादागीरी’ मागे संतोष रावत यांची ताकदा आहे. रावत आमदार झाल्यास, या समुदायाची दादागीरी ही गुंडगीरीत बदलेल अ​शीही भीती मूल तालुक्यातील जनतेला सतावत आहे. रावत यांचे विजयाने ही गॅंगचा दरारा मूल तालुक्यात वाढण्यांची भिती लोकांना असल्यांने, रावत यांना मतदार करावे कि करू नये अशा गोंधळात मतदार आहेत.

विधानसभा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here