चामोर्शी: ग्रामपंचायत घोट येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले .यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. रुपाली दुधबावरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाची आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या संघर्षाची माहिती देत मार्गदर्शन केले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे कर्मचारी श्री. दिनेश गावतुरे, अनिल पचारे, भाऊराव आत्राम, चरणदास सरवर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण शिवरायांच्या जयघोषांनी दुमदुमून गेले.










