भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवार यांचा अभिनव उपक्रम.. शितलताई यांचे मार्गदर्शन.. ४ महिन्याच्या मुलास रक्तदान करत रुचित बोधनकर ने जोपासलं माणुसकीचा धर्म..

0
127

वैरागड :– आरमोरी तालुक्यातील कु. मौजा – सोनेरांगी येथील विहान रणदिवे ४ महिने याची तब्बेत बरी नसल्याने तो ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रम्हपुरी येथे भरती होता. या संदर्भातील माहिती शितलताई सोमनानी यांना देण्यात आली. सदर बाळाला रक्ताची गरज आहे अशी माहिती मिळताच भोलू भाऊ सोमनानी यांच्या मित्र परिवारातील युवकांनी फोन करून विचारलं. कि रक्त पाहिजे आहे म्हणून तेव्हा लगेच युवकांनी ब्रम्हपुरीला जात हॉस्पिटल मध्ये विचारपूस केली कि विहान नामक पेशंट कुठे आहे. तेव्हा त्यांनी म्हटले कि, बालरुग्णांच्या वॉर्डात आहे आणि खुप छोटा आहे. विहान बाळ हा अवघ्या ४ महिन्याचा आहे.
हे माहिती पडताच रुचित आणि त्याचे सहकारी मित्र अभिमन्यू थक्क झालेत आणि आधी ब्लडबँक मध्ये जाऊन लगेच रक्त दिले. आणि तातडीने तितुनच त्याला रूम मध्ये बघायला जाऊन त्या चिमुकला बाळाची तब्बेत आणि त्याच्या हाताला असलेला बँडेज बघून भावुक झालेत. आणि भगवंताला म्हणातून विनंती केली कि चिमुकल्या मुलांवरती असं संकट नको येवो, किंवा इतर कुणावरतीचं नको येवो. त्यांनी त्या छोट्याश्या विहानला मिठीत पकडुन त्याचं कौतुक केलं, त्याच्या आईला भेटलं म्हटलं विहान बाळाची आणि स्वतःची काळजी घ्या टेन्शन नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं पाठबळ दिलं खरंच आपण केलेल्या मदतीने दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आलेला हसरे पणाने आपल्याला पुन्हा मदत करण्याची नवी ऊर्जा निर्माण करते, यापेक्षा दुसरं आंनद कुठंच नाही.

मित्र परिवारातील सर्व युवांना लोकांची सेवा करावी असे नेहमी वाटायचे परंतु ते शक्य होत नव्हते. परंतु भोलूभाऊ सोमनानी व शितलताई सोमनानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शितलताई यांच्या सहकार्याने आमच्यासारख्या युवकांना हे बळ मिळाले असून स्वतःसाठी नाही, “मरावे परी कीर्ती रुपी उरावे”. याचं म्हणी नुसार, आम्ही गरजू लोकांना निःस्वार्थ भावनेने धावून जायचं आहे. मदत करायची आहे, कसल्याही मदतीसाठी भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवारातील प्रत्येक सदस्य नेहमी तुमच्या सोबत आहे. ___ भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here