महाकुंभनगर : प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्राह्म मुहूर्तावर एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. मृतांपैकी २५ जणांची ओळख पटली. ३६ जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये कर्नाटकच्या बेळगावचे ४, आसाम व गुजरातमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मरण पावलेल्यांमध्ये बेळगावमधील ज्योती दीपक हत्तारवाथ (४४), त्यांची कन्या मेघा दीपक हत्तारवाथ (२४) अरुण खोपर्डे (६१) आणि