‘त्या’ गुन्ह्यातील आरोपींना अटक कधी? जीवन कोंतमवार यांचा सवाल
मूल येथील पत्रकार अशरफभाई मिस्त्री यांनी आपलेकडून खंडणी मागीतली. ती न दिल्यांने आपली व कुटूंबाची बदनामी सुरू केली. याविरोधात मूल पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसानी अशरफ मिस्त्रीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला मात्र कारवाई करण्यास पोलिस टाळाटाळ का करीत आहे असा सवाल तक्रारकर्ते जीवन कोंतमवार यांनी केला आहे?
आधी निवडणूकीची आचारसंहीता असल्यांचे कारण सांगणारे पोलिस निवडणूक संपूनही कारवाई का करीत नाही असा प्रश्न जीवन कोंतमवार यांनी केला आहे. पोलिसांनी कारवाई न केल्यांने अशरफभाई मिस्त्री यांचेकडून बदनामीची मोहीम सुरूच ठेवली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास आपण मूल पोलिसांचे विरोधात वरिष्ठांकडे दाद मागणार असल्यांचे कोंतमवार यांनी सांगीतले.