माही सोमनानी यांचा १० वा वाढदिवस उत्साहात साजरा..

0
108

गडचिरोली :- दिनांक २५ डिसेंबर रोजी माही सोमनानी हिचा १० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. माही सोमनानी ही भोलुभाऊ सोमनानी यांची जेष्ठ कन्या असून, तिच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लहान वयातच गोड स्वभाव, नम्रता आणि चुणचुणीतपणामुळे माहीने सर्वांचे मन जिंकले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सोमनानी कुटुंबाशी असलेल्या आपुलकीमुळे माहीच्या वाढदिवसाला जिल्हाभरातून नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतक शुभेच्छा देत आहेत.

माहीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून सदिच्छा व्यक्त करण्यात येत असून, तिच्या आयुष्यात आरोग्य, यश, आनंद आणि समृद्धी नांदो, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

माही सोमनानी यांना १० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here