- एटापल्ली तालुका, ८ जून २०२५ — एटापल्ली तालुक्यातील आलदंडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अलदंडी गावात सध्या सर्रासपणे रेती चोरीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली होती.
या पार्श्वभूमीवर आलदंडी पोलिसांनी कारवाई करत काही ट्रॅक्टर रेतीसह पकडण्यात यश मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ही कारवाई अचानक छापेमारी करून केली असून, यामध्ये बेकायदेशीर रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना अडवण्यात आले आहे.
या प्रकरणी चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, अशा अवैध कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पुढील तपास आणि कारवाईची तयारी सुरू आहे.महसूल विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत तर नाही ना ? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. ट्रॅक्टरची संख्या किती व त्या ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचे आहेत हे वृत्त लिहे पर्यंत कळले नाही
ग्रामस्थांनीही अशा बेकायदेशीर गोष्टींविरोधात पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.